RSS
email
4

पुन्हा एकदा पावसात

Read more
0

विडंबन... :)


विडंबन...
मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..

हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे.तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये.
तो भरलेला असेलच.

मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.

तो संपनार नाहीच.
शेवटी मेल बंद कर.
डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का???.

घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात एक मेल येईल.
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.
तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.

मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..
तुही वाच.
तो पुन्हा फॉरवर्ड करेल.
तू तो डीलीट कर.
एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???

मग निघायची वेळ होईल.
तरी पुन्हा मेल येईल.
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,
मग तुही तसेच लिही.

मेल मागून मेल येतील.
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.
शेवटी सगळे डीलीट कर.
आता रिकाम्या इनबॉक्स कडे बघ.
बघ माझी आठवण येते का..????

यानंतर लॉग आऊट व्हायला विसरु नकोस.
या नंतर पिसी बंद करण्याचा प्रयत्न कर.
या नंतर...ऑफिस मधुन बाहेर ये.
घरी लवकर जाण्याचा प्रयत्न कर.

येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी....
मेल करताना...बघ माझी आठवण येते का???
प्रशांत रेडकर
Read more
0

आमचे देशप्रेम सरले का???


प्रिय मित्र आणि मैत्रिणीनो....सहज एक कविता सुचली..जे मनात होते ते कागदावर उमटले आता ते तुमच्या पर्यन्त पोचवत आहे...कदचित चुकिचे वाटेलही...पण जे वाटले ते वाटले....बघा कविता कशी वाटते.

आमचे देशप्रेम सरले का???

शंडांची अवलाद....
कधी बदलणार नाही.
ही स्फोट झाले तरी..
आम्ही सुधारणार नाही.

घरात घुसुन शेजारी
आमची मुलेबाळे मारणार.
आम्ही मात्र भारत-पाक
मैत्रिचे पुल बांधणार.

वाटते कधी तरी मनाला,
मी ही अतिरेकी बनावे.
माझ्या हातुनही शेजाऱ्याचे,
पार्लमेंट हाऊस उडावे.

त्यांचा असेल जिहाद..???
आमचे धर्मयुद्ध कुठे???
स्वत:ला पुरुष म्हणवणारे.
सगळे झोपले कुठे???

त्यांनी मारायचे..
आम्ही बघायचेइतकेच हाती उरले का?????
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
आमचे देशप्रेम सरले का???
आमचे देशप्रेम सरले का???
प्रशांत रेडकर
Read more
1

हवी हवीशी वाटतेस तू


हवी हवीशी वाटतेस तू
-प्रशांत रेडकर

हवी हवीशी वाटतेस तू
कधी चंद्राची चांदणी होऊन,
तर कधी चातकाची तहाण बनून,
मनामध्ये दाटतेस तू......
(प्र रेडकर)

दिवसामागून दिवस जातात,
मन तुझाच विचार करतं.
कधी वाऱ्यासोबत,
तर कधी ताऱ्यामध्ये,
तुलाच शोधत फिरत.......

रिमझिम बरसणाऱ्या मेघांमध्ये,
मला तुझाच चेहरा दिसतो.
कधी अगदीच परिचित,
तर कधी अनोळखी सुद्धा वाटतो.

सगळच कस अकल्पित,
तरि मन बेभान का?
कुठून हे काहुर उठले,
आज हे तुफान का?
(प्र रेडकर)

प्रत्येक क्षणी तुझीच मला मग,
आठवण येत राहते.
तू नसताना मला तुझी,
सोबत देऊन जाते.

माहित आहे तसाही तुझा मी,
कुणीच लागत नाही.
पण मन माझ फितुर झालय,
ते माझ्या प्रमाणे वागत नाही.
(प्र रेडकर)

हवी हवीशी वाटतेस तू,
हवी हवीशी राहशील का?
माझ्या नजरेतुन कधीतरी,
स्व:ताकडे पाहशील का?
-प्रशांत रेडकर.
Read more
1

बहर ओसरला...


बहर ओसरला...
बहर ओसरला ग आता,बहर ओसरला...
वसंत ॠतु तर फिरुन परत आला,
वृक्ष मोहरायचे मात्र विसरला.

आठव म्हटलं तर आठवेल ते,
तू मात्र प्रयत्न नाही करणार.
तुझ्या नजरेत कायम आता,
माझ्यातला अपराधीच मागे उरणार.

तुला नेहमीच वाटत असेल,
चुका फक्त मीच केल्या.
आयुष्याच्या नाजुक वळणावरती,
वाटा माझ्या मी वेगळ्या नेल्या.

तु फक्त मलाच दोष दे,
तुझं असं वागणं मला आवडत.
अंत आता माझा जवळ आला,
मन पाखरु शेवटच फडफडत.

बहर ओसरला ग आत..
बहर ओसरला..
पण..तो माझ्या आयुष्याचा.
तुला अजुन खुप फुलायचय,
तु अशीच फुलत रहा.
तुझ्या इवल्या संसारामध्ये,
सुखी रहा खुलत रहा.

मला ते नेहमीच आवडेल.
आत्मा माझा शापित वेडा,
मुकत होऊन सुखाने रडेल.

खंत फक्त याचीच वाटते,
तुला मी कधी कळलोच नाही.
तुझ्या नजरेत भरण्या इतका,
जरा देखिल उरलो नाही.

पण..जरा शोध घेशील,
मी असा का वागलो?
का नाही पुर्ण केल्या आणाभाका?,
का नाही आपल्या वचनांना जागलो.

अरे..अरे मी हे काय करतोय?
मुडदे आता गाडले गेलेत,
उगा त्यांना का उकरतोय?
तु मात्र शोध घेवू नकोस,
झाले गेले विसरुन जा.
तुझ्या चिमुकल्यांच्या नजरेमधुन,
सुखी आयुष्याची स्वप्ने पहा.

बहर ओसरला ग आत,
बहर ओसरला...
देव देखिल या वेळी,
मला जवळ घ्यायला विसरला.
प्रशांत रेडकर.
Read more