RSS
email

बहर ओसरला...


बहर ओसरला...
बहर ओसरला ग आता,बहर ओसरला...
वसंत ॠतु तर फिरुन परत आला,
वृक्ष मोहरायचे मात्र विसरला.

आठव म्हटलं तर आठवेल ते,
तू मात्र प्रयत्न नाही करणार.
तुझ्या नजरेत कायम आता,
माझ्यातला अपराधीच मागे उरणार.

तुला नेहमीच वाटत असेल,
चुका फक्त मीच केल्या.
आयुष्याच्या नाजुक वळणावरती,
वाटा माझ्या मी वेगळ्या नेल्या.

तु फक्त मलाच दोष दे,
तुझं असं वागणं मला आवडत.
अंत आता माझा जवळ आला,
मन पाखरु शेवटच फडफडत.

बहर ओसरला ग आत..
बहर ओसरला..
पण..तो माझ्या आयुष्याचा.
तुला अजुन खुप फुलायचय,
तु अशीच फुलत रहा.
तुझ्या इवल्या संसारामध्ये,
सुखी रहा खुलत रहा.

मला ते नेहमीच आवडेल.
आत्मा माझा शापित वेडा,
मुकत होऊन सुखाने रडेल.

खंत फक्त याचीच वाटते,
तुला मी कधी कळलोच नाही.
तुझ्या नजरेत भरण्या इतका,
जरा देखिल उरलो नाही.

पण..जरा शोध घेशील,
मी असा का वागलो?
का नाही पुर्ण केल्या आणाभाका?,
का नाही आपल्या वचनांना जागलो.

अरे..अरे मी हे काय करतोय?
मुडदे आता गाडले गेलेत,
उगा त्यांना का उकरतोय?
तु मात्र शोध घेवू नकोस,
झाले गेले विसरुन जा.
तुझ्या चिमुकल्यांच्या नजरेमधुन,
सुखी आयुष्याची स्वप्ने पहा.

बहर ओसरला ग आत,
बहर ओसरला...
देव देखिल या वेळी,
मला जवळ घ्यायला विसरला.
प्रशांत रेडकर.

Bookmark and Share

1 comments:

Mallinath said...

सर्व कविता आवडल्या. ब्लॉग छान नटवलाय आहे. असेच वाचायला मिळू दे.-शुद्धमती राठी