
हवी हवीशी वाटतेस तू
-प्रशांत रेडकर
हवी हवीशी वाटतेस तू
कधी चंद्राची चांदणी होऊन,
तर कधी चातकाची तहाण बनून,
मनामध्ये दाटतेस तू......
(प्र रेडकर)
दिवसामागून दिवस जातात,
मन तुझाच विचार करतं.
कधी वाऱ्यासोबत,
तर कधी ताऱ्यामध्ये,
तुलाच शोधत फिरत.......
रिमझिम बरसणाऱ्या मेघांमध्ये,
मला तुझाच चेहरा दिसतो.
कधी अगदीच परिचित,
तर कधी अनोळखी सुद्धा वाटतो.
सगळच कस अकल्पित,
तरि मन बेभान का?
कुठून हे काहुर उठले,
आज हे तुफान का?
(प्र रेडकर)
प्रत्येक क्षणी तुझीच मला मग,
आठवण येत राहते.
तू नसताना मला तुझी,
सोबत देऊन जाते.
माहित आहे तसाही तुझा मी,
कुणीच लागत नाही.
पण मन माझ फितुर झालय,
ते माझ्या प्रमाणे वागत नाही.
(प्र रेडकर)
हवी हवीशी वाटतेस तू,
हवी हवीशी राहशील का?
माझ्या नजरेतुन कधीतरी,
स्व:ताकडे पाहशील का?
-प्रशांत रेडकर.
1 comments:
हवी हवीशी वाटतेस तू
कधी चंद्राची चांदणी होऊन,
तर कधी चातकाची तहाण बनून,
मनामध्ये दाटतेस तू...... khupach surekh
Post a Comment